Ad will apear here
Next
‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’


रत्नागिरी : ‘दिव्यांग बांधव शारीरिक व्याधींवर मात करून समाजात जगत असतात. त्यामुळे आपण सर्व जण समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात तीन डिसेंबर २०१८ रोजी अपंग दिनानिमित्त सुलभ निवडणुका हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उप-जिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, रत्नागिरी प्रांतधिकारी अमित शेडगे, रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, आस्था फाउंडेशनच्या सुरेखा जोशी, संकेत चाळके, प्रसाद आंबोळकर, राज्य अंपग कर्मचारी संघटनेचे श्री. गोरे, श्री. त्रिपाठी आदी मान्यवरांसह वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग, तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, ‘एक सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८मध्ये केलेल्या मतदार पुनरीक्षण  कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये ९२ हजार ६०४ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदानामध्ये दिव्यांग व्यक्तींना मतदार केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी, सुलभ मतदान व्हावे यासाठी आवश्यक ती सर्व दक्षात घेण्यात येत आहे. त्यामुळे सुलभ निवडणुका या ब्रीदवाक्यानुसार सुलभ मतदान करता येणार आहे. या वेळी होणाऱ्या मतदान प्रक्रीयेमध्ये ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट असणार आहे.  त्यामुळे आपण कुणाला मतदान केले ते स्क्रीनवर दिसणार आहे; तसेच त्याची प्रिंटही निघणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढणार आहे. मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, कर्तव्य आहे आणि आपण तो हक्क बजावावा.’



‘आपल्या दिव्यांग बांधवांमध्ये काही कलाकार, चित्रकार आहेत काही आपल्या पायांनी लिहितात, संगणक चालवतात. या दिव्यांगांमध्ये एक असामान्य अशी शक्ती आहे. सर्व अडचणींवर मात करून ते जीवन जगत असतात. तुम्हाला सर्व सहकार्य करण्यासाठी मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कटिबद्ध आहे. आपल्या जीवनामध्ये  उजाळा निर्माण करण्यासाठी, आपले जीवन सुलभ करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,’ असे आश्वासन चव्हाण यांनी या वेळी दिले.



मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तीन हजार ७६४ नवीन दिव्यांग मतदार बांधवांचे अर्ज नोंदवले असल्याचे सांगून मतदार वाढविण्यामध्ये संस्थांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभारही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या वेळी मानले. ‘लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मतदानाच्या माध्यमातून आपल्याला आपले विचार व्यक्त करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदान करणे हा आपल्याला दिलेला हक्क आहे आपले कर्तव्य आहे. आपला स्वत:चा, आपल्या बांधवांचा, आपल्या गावाचा, आपल्या राज्याचा व आपल्या देशाचा विकास साधण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, जेणेकरून मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल,’ असे चव्हाण यांनी सांगितले.

आस्था फाउंडेशनच्या सुरेखा जोशी यांनी दिव्यांगांना मतदानाच्या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेल्या प्रयत्नाबद्दल आभार मानले. ‘दिव्यांगांना मतदान करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी शासनाकडून सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत, त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा,’ असे आवाहन त्यांनी दिव्यांगांना केले.



या वेळी उप-जिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे,  प्रांताधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रसाद आंबोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. मतदार वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या आस्था फाउंडेशन, माहेर संस्था, केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, तसेच अपंगत्वावर मात करून स्वत:च्या पायांनी लिहिणाऱ्या, संगणक चालवणाऱ्या, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ यांसारख्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या धीरज साटवीलकर, श्री. म्हात्रे आदींचा प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन या वेळी सत्कार करण्यात आला.  

प्रास्ताविक तहसीलदार सुकटे यांनी केले.

(अपंग दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा मूकबधिर असोसिएशनची स्थापना करण्यात आली. ती बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZYXBV
Similar Posts
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निःशुल्क हेल्पलाइन; ध्वनिसंदेशांद्वारे माहिती रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, तसेच आपत्ती व्यव्यस्थापन विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना, शेती-पशुपालनाची तांत्रिक माहिती, सामाजिक उपक्रम, रोजगार आदींसह अन्य आवश्यक माहिती ध्वनिसंदेशामार्फत देण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला. रिलायन्स फाउंडेशन माहिती
श्यामराव भिडे कार्यशाळेत दिव्यांग दिन उत्साहात रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘क्षण रंगलेले’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
भाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट दाखल रत्नागिरी : तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस एच १९८’ हे हॉवरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनार्‍यावर गस्त घालत असताना १० जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर दाखल झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ जानेवारीला सकाळी या हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला
रत्नागिरीत ‘ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन रत्नागिरी : ग्रंथालय संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे २९ व ३० डिसेंबर या कालावधीत ‘रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे हा ग्रंथोत्सव होईल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language